अनेक संस्कृती खगोलशास्त्रीय घटनांना महत्त्व देतात. त्यापैकी भारतीय, चीनी आणि मयान संस्कृतींनी दिव्य निरीक्षणातून ऐहिक घटनांचे भाकित करण्यासाठी गुंतागुंतीची प्रणाली विकसित केली. पश्चिम संस्कृतीत ज्योतिषविद्या सर्वसाधारण पत्रिका प्रणालीत समाविष्टीत असते. व्यक्तीच्या पत्रिकेतील जन्माच्या वेळी चंद्र, सूर्य, आणि इतर दिव्य वस्तू यांच्या स्थानावरून व्यक्तिमत्त्वाचा पैलू आणि जीवनात भविष्यात काय घडेल याचे भाकीत केले जाते. बहुतांश व्यावसायिक ज्योतिषी अशा प्रणाल्यांचा वापर करतात. संपूर्ण इतिहासात ज्योतिषविद्येला बुध्दिमान परंपरा मानले होते.