तिथि- कृष्णचतुर्दशी, अमावस्या,क्षयतिथि, नक्षत्रे – अश्विनीची पहिली ४८ मिनिटे, पुष्याचा दुसरा व तिसरा चरण, आश्लेषा पूर्ण, मघा प्रथम चरण, उत्तराचा प्रथम चरण, चित्राचा पूर्वार्ध, विशाखाचा चतुर्थ चरण, जेष्ठा पूर्ण, मूळ पूर्ण, पूर्वाषाढाचा तिसरा चरण, रेवतीची शेवटची ४८ मिनिटे. योग – वैधृति, व्यतीपात, भद्रा (विष्टि), ग्रहणपर्वकाल, यमल म्हणजे जुळे, सदंत जन्म, अधोमुखजन्म, माता, पिता, भाऊ,बहिण यांचेपैकी एकाचे जन्मनक्षत्रावर जन्म झाल्यास, तीन मुलींनंतर मुलगा किंवा तीन मुलानंतर मुलगी, तसेच सूर्य संक्रमण पुण्यकाल,दग्ध, यमघंट, मृत्युयोग यापैकी कारण असेल तर शांति करावी.