पितरांच्या प्रसन्नतेसाठी धर्म नियमानुसार हविष्ययुक्त पिंड प्रदान करणे म्हणजेच श्राध्द होय . श्राध्द केल्याने पितरांना संतुष्टि लाभते आणि ते सदैव प्रसन्न राहतात आणि ते श्राध्द कर्त्याला दीर्घायू प्रसिध्दि, तेज स्त्री पशु व निरागता प्रदान करते. कुंडली मध्ये पितृ दोष हा एक महत्वाचा दोष मानला जातो .बहुतांश लोक याला पूर्वजांचे वाईट कर्माचे दुष्परिणाम मानतात तर काहींची अशी समजुत आहे कि पितरांचे दाह संस्कार योग्य रीतिने न झाल्याने ते आपल्याला त्रास देतात . जर सूर्य ,चंद्र ,राहू किंवा शनि यापैकी कोणतेही दोन एकाच घरात असल्यास कुंडलीत पितृ दोष होतो .
सामान्यतः व्यक्तीचे जीवन हे सुख दुःखाने ग्रासलेले असते . संपूर्ण जीवनात जरी सुखाने व्यक्तीची साथ सोडली तरी दुःख कोणत्या ना कोणत्या स्वरूपात त्याच्या सोबती असतो, मग ते संतानहीनता, नौकरीत अपयश,धन हानि,प्रगती न होणे,पारिवारिक कलह इ. स्वरूपात असू शकतो. पितृ दोष समजून घेण्या आधी पितृ काय आहे हे समजावून घेऊ या .
जर सूर्य आणि राहू यांची नवव्या स्थानावर युती होत असल्यास पितृ दोष योग तयार होतो. शास्त्रानुसार सूर्य किंवा राहू ज्या स्थितीत असतात, त्या स्थितीतील सर्व फळे नष्ट होतात. व्यक्तीच्या कुंडली मध्ये एक असा दोष आहे ज्यात सर्व दुःखांना एकत्रित देण्याची क्षमता असते ,या दोषाला पितृ दोष या नावाने ओळखले जाते.
पितृ दोषाची कारणे:
पितृ दोष निर्माण होण्याची अनेक कारणे असू शकतात. जसे की परिवार मध्ये अकाली मृत्यू झाली असल्यास, परिवार मध्ये या प्रकारच्या घटना एकाहून अधिक झालेल्या असल्यास, पितरांचे विधि श्राद्ध योग्य रीतीने न झाल्यास,धर्म कार्यात पितरांना न पूजने, परिवारात धार्मिक कार्य संपन्न होत नसल्यास, धर्माच्या विपरीत कार्य करणे, परिवारातील एखादया सदस्याकडून गौ हत्या झाली असल्यास, भ्रूण हत्या झाल्यास ही पितृ दोष होऊ शकतो. नवव्या स्थानी पिता चा भाव असतो. सूर्य हा पिता चा कारक असतो याशिवाय उन्नती, आयु, प्रगती, धर्म यांचाही कारक असतो. यावर जेव्हा राहू सारखा पापी ग्रह आपली अशुभ छाया पाडतो तेव्हा ग्रहण योग सोबत पितृ दोष बनतो. हा योग्य असलेल्या व्यक्तीचे भाग्योदय उशिरा होते. आपल्या योग्यतेनुसार पद प्राप्तीसाठी संघर्ष करावा लागतो. हिंदू शास्त्रानुसार देवपुजे पूर्व पितरांची पूजा करावी. कारण देवकार्योपेक्षा पितृकार्याला महत्व दिले जाते. पितृ कार्यासाठी सर्वात उत्तम पितृ पक्ष अर्थात आश्चिन मास चा कृ्ष्ण पक्ष समजला जातो.
पितृ दोषा ने ग्रासलेल्या जोडप्यास संतान प्राप्ती होत नाही. वारंवार गर्भपात होत असल्यास या दोषा वर विचार करायला हवा. पितृ दोषा पासून मुक्त्त होण्यासाठी काही विशेष उपाय:
पितृदोष पूजा (नारायण नागबलि पूजा) :
नारायण नागबळी माणसांच्या अपूर्ण इच्छा , अपेक्षा पुर्ण करण्याच्या उद्देशाने केला जातो.नारायण बळी व नागबळी हे दोन वेगवेगळे विधी आहेत. नारायण बळी हा पितृदोष दूर करण्यासाठी करतात आणि नागबळी हा नाग, साप यांची हत्या केली गेली असल्यास त्याचा दोष निवारण्यासाठी करतात. फक्त नारायण बळी अथवा नागबळी करू शकत नाही हे दोन्ही विधी एकत्र करावे लागतात.
वास्तूत: हा विधी जातकाच्या दुर्भाग्याच्या दोषांपासून मुक्ती मिळविण्यासाठी केला जातो. हा विधी कसा केला जातो आणि कोण करु शकतो याची पूर्ण माहिती असणं आवश्यक आहे.
महत्वपूर्ण सुचना :