Kalsarp Puja Trimbakeshwar Nashik Pandit Deepak Shastri Ji Mobile No.mobile9960637883

पूजा विधि

जर जातकाच्या लग्न कुंडलीत प्रथम, चतुर्थ, सप्तम, अष्टम किंवा द्वादश भावात मंगळ असेन आणि काही कारणांनी मंगळ दोष भंग होत नसेन तर मंगळ शांती करणे आवश्यक आहे.

जर जातकाच्या लग्न कुंडलीतील बारा भावांमध्ये राहू किंवा केतूच्या सोबत मंगळ असेन किंवा राहू केतू ची संपूर्ण दृष्टी मंगळावर पडत असेन तर अंगारा दोष लागतो.

जर जातकाच्या लग्न कुंडलीतील बारा भावांमध्ये राहू आणि गुरु एकत्र असतील किंवा राहूची संपूर्ण दृष्टी पडत असेन तर चांडाळ दोष लागतो.

जर जातकाच्या लग्न कुंडलीतील बारा भावांमधल्या कुठल्याही भावात रवी आणि शनी एकत्र असतील किंवा शनीची संपूर्ण दृष्टी रवीवर पडत असेन तर विष दोष लागतो.

जर जातकाच्या लग्न कुंडलीतील बारा भावांमधल्या कुठल्याही भावात राहू केतूच्या सोबत सूर्य असेन किंवा राहू केतूची संपूर्ण दृष्टी रवीवर पडत असेन तर या स्थितीत सूर्य ग्रहण दोष होतो.

लग्न कुंडलीच्या कुठल्याही भावात राहू केतू सोबात चंद्र असेन किंवा राहू केतूची संपूर्ण दृष्टी चंद्रावर पडत असेन तर या स्थितीत चंद्र ग्रहण दोष होतो.

जर जातकाच्या लग्न कुंडलीतील कुठल्याही भावात शनी आणि मंगळ एकत्र असल्यास किंवा शनीची संपूर्ण दृष्टी मंगळावर पडत असेन तेव्हा संघर्ष दोष लागतो.

जर जातकाच्या लग्न कुंडलीतील कुठल्याही भावात रवी – शुक्र किंवा बुध – मंगळ किंवा बुध – चंद्र किंवा गुरु – शुक्र किंवा शुक्र – रवी – चंद्र असेन तेव्हा युती दोष लागतो.

जर जातकाच्या जन्म कुंडलीत राहू किंवा केतूची महादशा चालू असेन तर त्या व्यक्तीला अनेक प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागतो. जसे की नोकरीत व्यत्यय येणे, विवाह संबंधित व्यत्यय, पारिवारिक कलह, कोर्ट कचेरीच्या चकरा, पोलीस केस, जमीन जायदाद संबंधी व्यत्यय, चुकीच्या व्यक्तीसोबत विवाह होणे, प्रेम विवाह इत्यादी.

जर जातकाच्या जन्म कुंडलीत शनीची महादशा चालू असेन किंवा शनी साडेसाती चालू असेन तर त्याला अनेक प्रकारचे दोष जसे विनाकारण कलंक लागणे , उन्नतीत व्यत्यय येणे, अशांती होणे, घरात कलह उत्त्पन्न होणे, व्यापारात व्यत्यय येणे, अपघात इत्यादी , जीवनात उलथापालथ होणे हि त्याची लक्षणे आहेत. या स्थितीत त्यांनी शनी महापूजा , जप अनुष्ठान करणे आवश्यक आहे.

जर जातकाचा विवाह किंवा व्रतबंध निश्चित झाला असेन , तर त्याला गुरुचे बल प्राप्त होण्यासाठी किंवा जातकाच्या जन्म कुंडली, जन्म राशीच्या अनुषंगाने गुरु जर ४,८,१२व्या स्थानात अनिष्ट असेन तर गुरु शांती करणे आवश्यक आहे.

जर मुलाच्या किंवा मुलीच्या कुंडलीत मृत्यूयोग असेन किंवा महादोषाची निर्मिती होत असेन आणि दोघांचा विवाह करणे अनिवार्य असेन अशा स्थितीत दोषाचा नाश करण्यासाठी कुंभ विवाह आवश्यक आहे.

कुठल्याही नव्या कामाची सुरुवात करण्यापूर्वी उदारणार्थ व्यापार / व्यवसाय , विवाह , गृह प्रवेश, इत्यादी कामांच्या सुरुवातीला निर्विघ्नतेसाठी नवग्रह शांती आवश्यक आहे.

अनेक संस्कृती खगोलशास्त्रीय घटनांना महत्त्व देतात. त्यापैकी भारतीय, चीनी आणि मयान संस्कृतींनी दिव्य निरीक्षणातून ऐहिक घटनांचे भाकित करण्यासाठी गुंतागुंतीची प्रणाली विकसित केली. पश्चिम संस्कृतीत ज्योतिषविद्या सर्वसाधारण पत्रिका प्रणालीत समाविष्टीत असते. व्यक्तीच्या पत्रिकेतील जन्माच्या वेळी चंद्र, सूर्य, आणि इतर दिव्य वस्तू यांच्या स्थानावरून व्यक्तिमत्त्वाचा पैलू आणि जीवनात भविष्यात काय घडेल याचे भाकीत केले जाते. बहुतांश व्यावसायिक ज्योतिषी अशा प्रणाल्यांचा वापर करतात. संपूर्ण इतिहासात ज्योतिषविद्येला बुध्दिमान परंपरा मानले होते.