Kalsarp Puja Trimbakeshwar Nashik Pandit Deepak Shastri Ji Mobile No.mobile9960637883

शनी महादशा व साडे साती


हा काळ १९ वर्षांचा असतो जो अतिशय कठीण असतो. शनि जर त्याच्या योग्य ठिकाणी असेन तर परिणामस्वरूप आपल्याला आदर, अधिकार आणि समृद्धी प्राप्त होते. परंतु जर तो योग्य ठिकाणी नसेल तर या कालवधीत मुख्य अडचणी, दु: ख आणि निराशा येते. हाड रोग, हाडे, त्वचा समस्या, संधिवात यांसारखे दोष उद्भवतात. य काळात व्यक्तीला अनेक अडचणींना सामोरे जावे लागते तसेच त्यांच्या मृत्युची शक्यता ही असते. व्यक्ती अध्यात्म, एकाग्रता, प्रामाणिकपणा, खरेपणा, निष्ठा यांपासून दूर जाते. अनारोग्य तसेच प्रिय व्यक्तीच्या मृत्यूची भीती उद्भवते.

साडेसाती

साडेसाती म्हणजे साडेसात वर्ष जेव्हा शनि जन्म राशि (चन्द्र राशि) मध्ये प्रवेश करून वास्तव्य करतो. शनिला सर्व १२ राशीत फिरायला ३० वर्षे लागतात. तो एका राशीत २ आणि १/२ वर्षे राहतो. या साडेसातीचा प्रभाव शनि दुस-या जन्म राशीत जात नाही तोपर्यंत असतोच. तीन राशी पार करण्यास त्याला ७ आणि १/२ वर्षे लागतात.