दु:ख शोक आदि दूर करणारे हे व्रत सगळ्या ठिकाणी यश देणारे आहे. मनुष्याने भक्ति आणि श्रद्धेने कुठल्याही दिवशी संध्येच्या वेळी ब्राम्हणांसमवेत आणि बन्धुनसमवेत धर्मपरायण होऊन श्री सत्यनारायण भगवानांची पूजा केली पाहिजे.
जो मनुष्य हे परम दुर्लभ व्रत करेन श्री सत्यनारायण भगवानाच्या कृपेने त्याला धन – धान्य प्राप्त होईन. निर्धन धनी आणि बन्दी बन्धनातून मुक्त होऊन जातात. संतानहीन असल्यास संतान प्राप्ती होते तसेच सर्व मनोरथ पूर्ण होऊन शेवटी तो वैकुंठात जातो.