वैदिक परंपरा नुसार, नवीन घरात प्रवेश करण्या अगोदर नवग्रहशांती आणि वास्तुशांती होम करणे आवश्यक असते.यामुळे वास्तुतील दोष दूर होतात आणि घरात सुख समृद्धी येते.यात नवग्रह सुक्त व नवग्रहांच्या १०८ नामावलींचा पाठ करतात.मग रुद्र पाठ आणि विहित साहित्यासह होम करून करतात वास्तुशांती पूजा करतात.
खालील परिस्थितींमध्ये वास्तुशांती करतात
- वास्तुशास्त्राच्या परिमाणांच्या विरुद्ध जागा निवडणे.
- वास्तुशास्त्र नियमांच्या विरुद्ध इमारत बांधणे.
- इमारती आणि खोल्यांच्या आतील व्यवस्थापनेत दोष असणे.
- जुने घर खरेदी करताना.
- घराच्या किंवा इमारतीच्या नुतानिकाराणाच्या वेळी.
- नवीन घराच्या गृहप्रवेशाच्या वेळी.